गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला
गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला
जगाने ठेवले पाण्यात देवाला
कसा मागायचा आधार बुडत्याला
हसू, अश्रू, निराशा, दु:ख, आशा, सल
फळे आली किती एकाच झाडाला
अशी का माणसांनी झाकली तोंडे
गुन्हा हातून यांच्या कोणता झाला
उभा तो वेगळ्या लोकांमधे आहे
तुझा आवाज नाही यायचा त्याला
जगाचे वाहतो सुखदु:ख कवितेतुन
किती असणार किंमत या हमालाला
उन्हे येतील आता गारव्यासाठी
अता होईल पिवळा आपला पाला
उद्या गावातुनी या जाउया निघुनी
पहाटे पाचला तू पोच फाट्याला
- वैभव देशमुख
जगाने ठेवले पाण्यात देवाला
कसा मागायचा आधार बुडत्याला
हसू, अश्रू, निराशा, दु:ख, आशा, सल
फळे आली किती एकाच झाडाला
अशी का माणसांनी झाकली तोंडे
गुन्हा हातून यांच्या कोणता झाला
उभा तो वेगळ्या लोकांमधे आहे
तुझा आवाज नाही यायचा त्याला
जगाचे वाहतो सुखदु:ख कवितेतुन
किती असणार किंमत या हमालाला
उन्हे येतील आता गारव्यासाठी
अता होईल पिवळा आपला पाला
उद्या गावातुनी या जाउया निघुनी
पहाटे पाचला तू पोच फाट्याला
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment