गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू
अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू
नव्या काळात या भलता जुना आहेस तू
कधीपासून काही बातमी नाही तुझी
कुठे आहे... कुठे माझ्या मना आहेस तू
जगाला वाटते धोका दिला आहेस पण;
दिली मजला खरेतर चालना आहेस तू
कधी तू पाहिले डोळ्यात रोखूनी तुझ्या
कधी केला स्वत:चा सामना आहेस तू
जगाची वेदना नुसताच पाहत राहतो
कशासाठी दिली संवेदना आहेस तू
किती बिंबे तुझ्यावर हालताना पाहतो
कुणाचा नेमका माझ्या मना आहेस तू
- वैभव देशमुख
नव्या काळात या भलता जुना आहेस तू
कधीपासून काही बातमी नाही तुझी
कुठे आहे... कुठे माझ्या मना आहेस तू
जगाला वाटते धोका दिला आहेस पण;
दिली मजला खरेतर चालना आहेस तू
कधी तू पाहिले डोळ्यात रोखूनी तुझ्या
कधी केला स्वत:चा सामना आहेस तू
जगाची वेदना नुसताच पाहत राहतो
कशासाठी दिली संवेदना आहेस तू
किती बिंबे तुझ्यावर हालताना पाहतो
कुणाचा नेमका माझ्या मना आहेस तू
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment