गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती

मनाची ही स्थिती आधी कुठे होती
उदासी एवढी आधी कुठे होती

कुठे या पापणीला यायचे तारे
अशी ही पापणी आधी कुठे होती

सुखाची वेल होती डवरली नुसती
सुखाला या कळी आधी कुठे होती

कुठे इतके कठिण होते इथे जगणे...
मराया रांग ही आधी कुठे होती

तुझ्या भाळी सुखाने ओठ टेकवले
तुझ्या गाली खळी आधी कुठे होती

मलाही देह हा होता कुठे आधी
तुलाही सावली आधी कुठे होती

- वैभव देशमुख

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू