■ गझल : कुठे हृदयातले बोलायला येते
गझल : कुठे हृदयातले बोलायला येते
कुठे हृदयातले बोलायला येते
कुठे हृदयातले बोलायला येते
कुठे इतके खरे बोलायला येते
मला वाचा दिली आहेस तू कविते
मला तुझियामुळे बोलायला येते
मुका असतो बसुन जेव्हा कुठेही मी
स्मरण मजला तुझे बोलायला येते
तुझे डोळे किती हे बोलके दोन्ही
कुठे यांच्यापुढे बोलायला येते
मला कळतात ही बोलायची वळणे
मलाही वाकडे बोलायला येते
पुढे आलो तुझ्या की मौन होतो मी
उभ्या दुनियेपुढे बोलायला येते
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment