■ गझल : कबीले आसवांचे चालते झाले...

गझल : कबीले आसवांचे चालते झाले...

कबीले आसवांचे चालते झाले
तुला बघताच डोळे वाहते झाले
 

तडे बुरुजास गेले निग्रहाच्या अन्
मनोरे संयमाचे हालते झाले

उदासी, स्वप्न, प्रीती, दु:ख, आशा, भय...
मना, माहित तुझे सारे पते झाले 

अशी काही कुदळ बसली मनावरती
मनाचे पात्र अवघे वाहते झालेेेे

तुझ्याविण काम माझे कोठले होइल
तुझ्याविण काम माझे कोणते झाले

नवस केला तुझ्या साक्षात भेटीचा
जगीचे देव सारे पावते झाले

तुझ्या लक्षात मी राहीन का आता
तुझे लक्ष्यात आता चाहते झाले

अता तू मस्तपैकी ओढ रेघोट्या
जिवाचे पीठ माझ्या आयते झाले

कि होते लोक आधी हे ऊसावाणी  
कि त्यांचे फार नंतर कोयते झाले 

- वैभव देशमुख

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती