■ गझल : बोलत असतो खोटे आपण...
गझल : बोलत असतो खोटे आपण...
बोलत असतो खोटे आपण
किती वाहतो ओझे आपण
किती वाहतो ओझे आपण
खूप पुढे गेली ही दुनिया
खूप राहिलो मागे आपण
खूप राहिलो मागे आपण
ज्या झाडाची मुळे हरवली
त्या झाडाची पाने आपण
त्या झाडाची पाने आपण
कधी कधी कवडीमोलाने
विकले आहे सोने आपण
विकले आहे सोने आपण
कधी जुनी उघडून डायरी
वाचत बसतो पत्ते आपण
वाचत बसतो पत्ते आपण
काळे आपण मातीहुनही
सोन्याहुनही पिवळे आपण
सोन्याहुनही पिवळे आपण
तेव्हा भरले आपण भाडे
आता भरतो हप्ते आपण
आता भरतो हप्ते आपण
जळते आहे चिता आपली
धरले आहे मडके आपण
धरले आहे मडके आपण
ऐकत नाही मन अजूनही
किती द्यायचे चटके आपण
किती द्यायचे चटके आपण
कोणी येइल वाटत नाही
बंद करूया दारे आपण
बंद करूया दारे आपण
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment