■ गझल : क्षितीजावर निरोपाचा प्रहर आहे


गझल : क्षितीजावर निरोपाचा प्रहर आहे 

क्षितीजावर निरोपाचा प्रहर आहे
किती कातर निरोपाचा प्रहर आहे 

फुटे घागर निरोपाचा प्रहर आहे
उडे केशर निरोपाचा प्रहर आहे

तिथे तू दूर मैलो माझियापासुन
नि हाकेवर निरोपाचा प्रहर आहे 


उदासी दाटली सार्‍या जगावरती
जणू जगभर निरोपाचा प्रहर आहे 


दवाचा प्रहर होता भेटलो तेव्हा
किती खडतर निरोपाचा प्रहर आहे

जरा दे हात हाती आणि पाहु दे
तुला क्षणभर... निरोपाचा प्रहर आहे

जवळ आलेत सारे दूर गेलेले
किती सुंदर निरोपाचा प्रहर आहे

- वैभव देशमुख  

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती