■ गझल : जर्द उन्हाला गर्द सावल्या होत्या...

गझल : जर्द उन्हाला गर्द सावल्या होत्या...
जर्द उन्हाला गर्द सावल्या होत्या
कविता माझ्या माझा पाला होत्या  
म्हटले तर त्या साध्या टिचक्या होत्या
म्हटले तर आगीच्या तोफा होत्या
नकळे कसले वाटप चालू होते
जागोजागी नुसत्या रांगा होत्या
दुनिया सारी घरात बसली होती
पार्किंगमध्ये सगळ्या गाड्या होत्या
 
कोणाच्या पायाला होती कुरूपे
कोणाच्या पायाला चिखल्या होत्या 


कमरेवरती चिल्ली पिल्ली होती
डोईवरती हंडे-कळशा होत्या


एकाच्या हाताला होती बंदुक
दुसर्‍याने गोळ्या चालवल्या होत्या
पाहत होतो मी काळाच्या पुढचे
काळाच्या भिंतीला भेगा होत्या
-    वैभव देशमुख

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती