■ गझल : उदासीचे नवे थर या बघायाला
■ गझल : उदासीचे नवे थर या बघायाला
उदासीचे नवे थर या बघायाला
मनाचे हे नवे घर या बघायाला
कधी संपेल याची श्वाश्वती नाही
सुरू झालाय पिक्चर या बघायाला
किती फुललीत कमळे ही उजेडाची
तमाचे हे सरोवर या बघायाला
अजुन हे लोक त्यांच्या भाकरी भवती
कसे फिरतात गरगर या बघायला
पुढे आहे भयानक दृष्य डोळ्यांनो
कसुन आधीच कंबर या बघायाला
बघायासारखे नाही शहर आता
तरीही वाटते तर या बघायला
तुम्हासाठीच त्याची जिंदगी झिजली
अता झालाय जर्जर... या बघा याला
उद्या होणार आहे एक तारा मी
तुम्हाला यायचे तर या बघायाला
- वैभव देशमुख
उदासीचे नवे थर या बघायाला
मनाचे हे नवे घर या बघायाला
कधी संपेल याची श्वाश्वती नाही
सुरू झालाय पिक्चर या बघायाला
किती फुललीत कमळे ही उजेडाची
तमाचे हे सरोवर या बघायाला
अजुन हे लोक त्यांच्या भाकरी भवती
कसे फिरतात गरगर या बघायला
पुढे आहे भयानक दृष्य डोळ्यांनो
कसुन आधीच कंबर या बघायाला
बघायासारखे नाही शहर आता
तरीही वाटते तर या बघायला
तुम्हासाठीच त्याची जिंदगी झिजली
अता झालाय जर्जर... या बघा याला
उद्या होणार आहे एक तारा मी
तुम्हाला यायचे तर या बघायाला
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment