■ गझल : शुभ्र सारेच या जगात जणू...

गझल : शुभ्र सारेच या जगात जणू... 

शुभ्र सारेच या जगात जणू
डाग अपुल्याच फक्त आत जणू
एक इच्छा सळाळतेय किती
टाकली नेमकीच कात जणू
काम मजलाच सांगती सारे
फक्त आहे मलाच हात जणू
चांदणे सांडले सुरात तुझ्या
चंद्र आहे तुझ्या गळ्यात जणू
टोचुनी टाचण्या फुटत नाही
फोम भरले तुझ्या फुग्यात जणू
सारखे खळखळून हे हसणे
खूप आहेस तू सुखात जणू
एक अश्रू न डोळियात तुझ्या
प्राण परतेल या शवात जणू
देव बनले कुणी, कुणी साधू
राहिलो मीच माणसात जणू
-    वैभव देशमुख

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती