■ गझल : फुलांचे ते दिवस निसटून जाण्याला
■ गझल : फुलांचे ते दिवस निसटून जाण्याला
फुलांचे ते दिवस निसटून जाण्याला
किती झाला जमाना त्या जमान्याला
उतरली राधिका यमुनेत न्हाण्याला
निळा आला किती हा रंग पाण्याला
उडाले पाखरू आभाळ होण्याला
निळ्या रंगामधे मिसळून जाण्याला
किती मित्रांमधे वाटून घेण्याला
मिळायचे किती सुख चार आण्याला
अता भेटी कुठे माझ्या तुझ्या भेटी
अता कोठे ठिकाणा तो ठिकाण्याला
अजुनही लाल रंगाचीच ती यस्टी
पकडतो मी जुन्या दिवसात जाण्याला
अजुन लाटांवरी मी डूचमळत आहे
अजुन मी लागलो नाही ठिकाण्याला
पुन्हा करतो गुलामी त्याच प्रश्नांची
पुन्हा जुंपून घेतो त्याच घाण्याला
कधी ठकठक मनाची थांबते अपुल्या
कधी असते सुटी या कारखान्याला
कटी घेऊन घागर लाल सूर्याची
नदीमध्ये उतरली सांज पाण्याला
पुन्हा भेटू जुन्या गुलमोहराखाली
'बसू' थोडे फुलांच्या शामियाण्यालाया
- वैभव देशमुख
फुलांचे ते दिवस निसटून जाण्याला
किती झाला जमाना त्या जमान्याला
उतरली राधिका यमुनेत न्हाण्याला
निळा आला किती हा रंग पाण्याला
उडाले पाखरू आभाळ होण्याला
निळ्या रंगामधे मिसळून जाण्याला
किती मित्रांमधे वाटून घेण्याला
मिळायचे किती सुख चार आण्याला
अता भेटी कुठे माझ्या तुझ्या भेटी
अता कोठे ठिकाणा तो ठिकाण्याला
अजुनही लाल रंगाचीच ती यस्टी
पकडतो मी जुन्या दिवसात जाण्याला
अजुन लाटांवरी मी डूचमळत आहे
अजुन मी लागलो नाही ठिकाण्याला
पुन्हा करतो गुलामी त्याच प्रश्नांची
पुन्हा जुंपून घेतो त्याच घाण्याला
कधी ठकठक मनाची थांबते अपुल्या
कधी असते सुटी या कारखान्याला
कटी घेऊन घागर लाल सूर्याची
नदीमध्ये उतरली सांज पाण्याला
पुन्हा भेटू जुन्या गुलमोहराखाली
'बसू' थोडे फुलांच्या शामियाण्यालाया
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment