■ फक्त कविता सांग तू निरुपण नको


फक्त कविता मांड तू निरुपण नको
फक्त चेहरा दाव तू दर्पण नको

पाखरे होतील नरभक्षी उद्या
एवढी फिरवायला गोफण नको


वाटते आहे मनातुन भेटुया
वाटते आहे मनातुन...पण नको


हो तुला जे व्हायचे, घे काळजी...
चंदनाचे व्हायला सरपण नको

(काळ जेव्हा लागतो शिकवायला
वाटते कुठलेच अध्यापन नको)

भेटण्याची लाभली आहे मुभा
पण अजुन भेटायला आपण नको

- वैभव देशमुख 

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती