■ जडी बुटीच्या पिशव्या होत्या

■ जडी बुटीच्या पिशव्या होत्या...

जडी बुटीच्या पिशव्या होत्या
घरोघरी म्हातार्‍या होत्या

चर्येवरच्या सुरकुत्यांमधे
कथा-कहाण्या दडल्या होत्या

डोळ्यांमधल्या दोन बाहुल्या
आता बाया झाल्या होत्या

लाल टपोर्‍या कुंकाखाली
हिरव्या हिरव्या इच्छा होत्या

जिवंत असण्याच्या मरणाच्या
सगळ्या रेषा बुजल्या होत्या

अजून दु:खाच्या ओठाला
चिकटवलेल्या पट्ट्या होत्या

थरथरणाऱ्या हातांमध्ये
लाख उबेच्या लाटा होत्या

कुठे कुठे घेऊन जायच्या
गप्पांमध्ये गाड्या होत्या

- वैभव देशमुख 

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती