गझल : जिंकलो रण… मी पुढे आलो


गझल : जिंकलो रण मी पुढे आलो
 
जिंकलो रण मी पुढे आलो
मारले मन
मी पुढे आलो...

एक विंडोसीट आवडली  
एक स्टेशन मी पुढे आलो

मारला पाठी कुणी धक्का
आणि धपकन मी पुढे आलो

जिंकणार्‍याची स्तुती केली...
हारलो पण मी पुढे आलो

एक तपभर चालल्यानंतर
एक काकण मी पुढे आलो

ज्याक्षणी नव्हता तुझ्याकडुनी
एकही जन...मी पुढे आलो

काय मरणाचे मला आता
काय जीवन...मी पुढे आलो

खूप माझ्यासारखे होते
एकटा पण मी
, पुढे आलो

सोड आता...सोड...मुड गेला
लाव झाकण मी पुढे आलो

- वैभव देशमुख  

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती