■ गझल : भूक आहे, तहानही आहे
■ गझल : भूक आहे, तहानही आहे
भूक आहे, तहानही आहे
पेटले आसमानही आहे
दान करतो लपून देवाला
पापि तो पुण्यावानही आहे
काय करु ते कुणा कळत नाही
वेळ दोलायमान ही आहे
भाळतो कोण फक्त रूपाला...
ती बया बुद्धिमानही आहे
(गझल करतोन् गीतही रचतो
एक त्याचे दुकानही आहे )
घ्या सबादून चूक पोराची
अजुन थोडा लहानही आहे
( सर्व शहरास समजले आता
एक कोणी "वुहान"ही आहे)
लावतो आकडे, पितो गांजा
त्यास अध्यात्म ज्ञानही आहे
ओढतो लाल सूर्य सांजेचा
मी पितो गर्द रानही आहे
- वैभव देशमुख
भूक आहे, तहानही आहे
पेटले आसमानही आहे
दान करतो लपून देवाला
पापि तो पुण्यावानही आहे
काय करु ते कुणा कळत नाही
वेळ दोलायमान ही आहे
भाळतो कोण फक्त रूपाला...
ती बया बुद्धिमानही आहे
(गझल करतोन् गीतही रचतो
एक त्याचे दुकानही आहे )
घ्या सबादून चूक पोराची
अजुन थोडा लहानही आहे
( सर्व शहरास समजले आता
एक कोणी "वुहान"ही आहे)
लावतो आकडे, पितो गांजा
त्यास अध्यात्म ज्ञानही आहे
ओढतो लाल सूर्य सांजेचा
मी पितो गर्द रानही आहे
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment